Home आरोग्य ईएसआयसी लाभार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा 

ईएसआयसी लाभार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा 

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ई.एस.आय.सी. (Employees’ State Insurance Corporation – ESIC) योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जळगाव येथील राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये आधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकाच छताखाली विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णाभिमुख सेवा उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जनरल मेडिसिन विभागात ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसह विविध सर्वसामान्य आजारांचे निदान व उपचार केले जातात. आधुनिक तपासणी सुविधांसह अनुभवी वैद्यकीय अधिकारी रुग्णांची नियमित तपासणी करून आवश्यक उपचार देत आहेत. स्त्रीरोग व प्रसूती विभागात गर्भधारणेपूर्व तपासणी, गर्भधारणेदरम्यान नियमित एएनसी (ANC) सेवा, सुरक्षित सामान्य प्रसूती, सिझेरियन प्रसूती तसेच महिलांशी संबंधित विविध आजारांवरील उपचार उपलब्ध आहेत. महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) विभागात हाडे, सांधे आणि स्नायूंशी संबंधित आजारांचे निदान व उपचार, फ्रॅक्चर व्यवस्थापन तसेच आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येतात. अपघातग्रस्त रुग्णांसाठी तातडीची उपचार सुविधा देखील उपलब्ध असून अनुभवी तज्ज्ञांकडून सेवा दिली जाते. जनरल सर्जरी विभागात हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय (गॉल ब्लॅडर) यांसह विविध शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने केल्या जात आहेत. याशिवाय नेत्ररोग विभागात डोळ्यांची संपूर्ण तपासणी, दृष्टीदोष निदान, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तसेच इतर नेत्रविकारांवरील उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

रुग्णालयात ई.एस.आय.सी. कार्डधारक लाभार्थ्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि गुणवत्तापूर्ण उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. रुग्णालय प्रशासनाने सर्व ई.एस.आय.सी. कार्डधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास वेळेत तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे. ई.एस.आय.सी. योजनेबाबत अधिक माहितीसाठी आणि उपचारांसाठी राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, जळगाव येथे संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound