आजपासून, बँक नवीन सवलत देणार

SBI

मुंबई प्रतिनिधी । सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय बँकने आजपासून आयएमपीएसवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना नवीन सवलत मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं आयएमपीएसवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. एसबीआयच्या नेट बँकिंग आणि मोबाईल अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांना देखील आता कोणताही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही आहे. एसबीआयनं याआधीच एनईएफटी आणि आरटीजीएस शुल्का रद्द केलं आहे. नोएडा भागात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. या भागातील जमिनीच्या दरांमध्ये थोडी घसरण होईल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळेल. नोएडा भागातील जमिनींना लागू असलेला ६ टक्के अधिभार रद्द करण्यात आला आहे. याशिवाय मॉलवरील २५ टक्के अधिभारदेखील रद्द केला गेला आहे.

इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी परिषदेच्या ३६व्या बैठकीत इलेक्ट्रिक कारवरील कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १० लाखांपर्यंतच्या गाड्यांची किंमत ७० हजारांनी कमी होणार आहे.

Protected Content