घरकुल घोटाळ्याचा निकाल पाचव्यांदा लांबला

gharkul ghotala

धुळे, प्रतिनिधी | येथील जिल्हा न्यायालयात आज लागणार असलेला जळगाव येथील घरकुल घोटाळ्याचा निकाल आज पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज (दि.१ ऑगस्ट) सलग पाचव्यांदा हा निकाल लांबणीवर पडला असून आता निकालाची पुढली तारीख २६ ऑगस्ट २०१९ देण्यात आली आहे.

 

जळगाव नगर पालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणी ४५ कोटी रुपयांच्या अपहाराचा खटला येथील जिल्हा न्यायालयात सुरु आहे. या प्रकरणात माजीमंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. आज या प्रकरणी काय निकाल दिला जातो ? त्याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून होते. येथील न्यायाधीश सृष्टी नीलकंठ ह्या रजेवर असल्याने आज पुन्हा निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Protected Content