जळगावात स्काऊट मास्तर प्रशिक्षणास सुरुवात

scouts and guides

 

जळगाव प्रतिनिधी । भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थाच्या वतीने स्काऊट मास्तर मुलभूत प्रशिक्षण शिबिर दि.1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रशिक्षणात स्काऊट मास्तर मुलभूत प्रशिक्षण शिबिरात व्यायाम स्काऊटचे जनक लॉर्ड बेडन पावेल यांचे विचार या प्रशिक्षणात शिकवले जातील. याठिकाणी जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शाळेतील स्काऊट मास्तर प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. यात स्काऊट मास्तर उत्साहाने व आनंदाने बेसिक प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहेत. यावेळी स्काऊट मास्टर जिल्ह्याचे सचिव भास्कर पवार हे प्रशिक्षण देत असून त्यांना सहकारी कोळी, विजय पाटील हे देखील त्यांना सहकार्य करत आहेत.

Protected Content