ऑटोनगरात जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगाव भुसावळ रोडवरील ऑटो नगरात झन्नामन्ना खेळणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलीसात आज शनिवारी सायंकाळी ६ वाजता छापा टाकला यात नऊ जणांवर कारवाई करत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या ऑटो नगरातील एका कॉम्लेक्सच्या गच्चीवर ९ ते १० जण झन्नामन्ना नावाचा खेळ खेळत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने आज शनिवार ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात संशयित आरोपी आरिफशहा लतीफ शहा (वय-३०) रा. बॉबे बेकरी मेहरूण, राहुल वसंत झुरकाडे (वय-३०) रा. आयोध्या नगर, चेतन लक्ष्मण माळी (वय-३०) रा. खेडी ता.जि.जळगाव, राजू बंसीलाल परिहार (वय-४२) रा. जोशी पेठ, किरण रमेश चौधरी (वय-४०) रा. तुळसाई नगर, सोमनाथ बाबुराव चव्हाण (वय-४०) रा. सुप्रिम कॉलनी, चंद्रकांत पंढरीनाथ महाजन (वय-४४) रा. अयोध्या नगर, जितेंद्र भानुदास पाटील (वय-३३) रा. अयोध्या नगर आणि दत्तात्रय प्रकाश चौधरी (वय-३०) रा. तुळसाई नगर या नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील झन्नमन्ना खेळण्याचे साहित्य व ३ हजार ६०० रूपये रोख हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस नाईक गणेश शिरसाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुनिल सोनार, पो.ना. गणेश शिरसाळे, पो.कॉ. सचिन पाटील, किशोर पाटील यांनी कारवाई केली.

Protected Content