न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सुरू होण्याची शक्यता

loya

 

मुंबई (वृत्तसंस्था) सीबीआय विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी मृत्यूबाबत कोणी ठोस पुराव्यासह तक्रार दाखल केल्यास या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

 

न्यायमूर्ती बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी तसे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बुधवारी रात्री, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली. न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत कोणी ठोस पुराव्यासह तक्रार दाखल केल्यास या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर न्या. लोया यांच्या मृत्यू चौकशीची मागणी लोकांनी केल्यास ती पूर्ण करावी लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर पुन्हा एकदा न्या. लोया मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे.

Protected Content