तरूणाच्या शेतातून शेततळ्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद लांबविला; पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पहूर लाईव्ह ट्रेन न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे शेतातून शेतकऱ्याच्या मालकीचा ७० हजार रुपये किमतीच्या शेततळ्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

परीश बळीराम सपकाळ (वय-३९) रा. शिवदत्त नगर, शेंदुर्णी ता.जामनेर हा तरुण आपल्या परिवाराचा वास्तव्याला असून शेती करून आपला उतरनिर्वाह करतो. त्याचे शेंदुर्णी शिवारातील शेत गट नंबर ५७१/३ मध्ये शेत आहे. या शेतात तरुणाने शेततळे बनवले असून पाणी टिकून राहावे, यासाठी लागणारा प्लास्टिक कागद त्या ठिकाणी ठेवलेला होता. दरम्यान हा कागद अज्ञान चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेला. या संदर्भात परिश सपकाळ या तरुणाने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Protected Content