साहित्यिक हे समाजजागृतीचे कार्य करतात:- पी.टी.पाटील

पहूर.ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साहित्यिक हे त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य करतात असे प्रतिपादन टाकरखेडा शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी जि.प मराठी शाळेत सांगितले.

जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे होते. त्यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी उपशिक्षक श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, जयंत शेळके, रामेश्वर आहेर यांनी कुसुमाग्रज यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी प्रांजल सुरळकर हिच्या कलेबद्दल प्रांजल व तिच्या आईचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जंयती शेळके यांनी केले व आभार मानले.

Protected Content