यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज द्वारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय.क्यू. ए.सी., प्लेसमेंट सेल, व क्रेडिट एक्सेस ग्रामी्ण लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन एरिया मॅनेजर संजय द्वासे, शाखा व्यवस्थापक योगेश पळसपगार, इमरान शहा, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे, विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे असे मार्गदर्शन केले. यावेळी एरिया मॅनेजर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यात ६२  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यात १४  विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिली जाणार आहे.  सूत्रसंचालन प्रा. संजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. मनोज पाटील यांनी मानले. याश्वितेसाठी डॉ. एस. पी. कापडे, डॉं. सुधा खराटे, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, अरुण सोनवणे, इ.आर. सावकार, नरेंद्र पाटील, गणेश जाधव, सी. टी. वसावे, सुभाष कामळी, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद कदम, अनिल पाटील, प्रमोद जोहरे,अमृत पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content