भाजपा किसान मोर्चाचे प्रविण कुंडलकर यांना ‘म्यूझिक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्कार जाहीर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपा किसान मोर्चा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष व किसान फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष व माती व पाणी परिक्षणाच्या मिनी प्रयोगशाळा संपुर्ण महाराष्ट्रात सुरु करणारे कृषीरत्न प्रविण कुंडलकर यांना “म्युझिक ऑफ रेकॉर्ड” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

प्रविण कुंडलकर यांच्यामुळे आज कित्येक बेरोजगार युवकांना रोजगार मिळून देण्याचे प्रामाणिक काम करत आहे. सोबतच नेमक शेतकरी बांधवांनी कोणत्या ऋतुमध्ये कोणते पिक घ्यावे तसेच माती व पाणी परिक्षण करून शेतकरी बांधव हा आपल्या जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण कमी किंवा जास्त याबाबत योग्य मार्गदर्शन सतत करत असल्यामुळे तसेच विहरीच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण कसे कमी करता येईल याचे सखोल मार्गदर्शन शेतकरी बांधवांना किसान फाऊंडेशच्या वतीने करत असल्यामुळे शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये योग्य पिक घेत आहेत.

याच कामाची दखल “म्युझिक ऑफ रेकॉर्ड” फरीदाबाद (दिल्ली) ने “लाईफस्टाईल अचिव्हमेंट अवार्ड नॅशनल पुरस्कार – २०२२” करिता वरुड तालुक्यातील पेठ मांगरूळी या गावातील रहिवासी कृषीरत्न प्रवीण कुंडलकर यांची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे किसान फाउंडेशन, भाजपा किसान मोर्चा, शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग व त्यांच्या मित्र मंडळी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. कृषीरत्न प्रवीण कुंडलकर यांचे सामाजिक कार्यामध्ये मोलाचे कार्य आहे. त्यांना हा पुरस्कार १४ ऑक्टोबरला फरीदाबाद (दिल्ली) येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्रवीण कुंडलकर हे अत्यंत सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र असून त्यांची नॅशनल पुरस्कारा साठी निवड होताच संपूर्ण वरुड तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण व शुभेच्छाचा वर्षाव त्याच्या वर होत आहे.

Protected Content