उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रवीण पाटील यांचा सत्कार

सावदा प्रतिनिधी । पत्रकार प्रवीण पाटील यांना दर्पण पत्रकार फाऊंडेशनतर्फे उत्कृष्ट पत्रकार व पत्रकार संघटना फैजपूरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

दर्पण पत्रकार फाउंडेशन रावेर तर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील सकाळ बातमीदार यांचा ओम कॉलनी सावदा येथे जेष्ठ विचारवंत मार्गदर्शक,लेखक, साहित्यिक प्रा.व. पु.होले, निवृत्त मुख्याध्यापक श्रीधर सरोदे, फिरके यांनी शाल श्रीफळ पुष्पुच्छ देऊन सत्कार करून कौतुक केले.

यावेळी प्रवीण पाटील म्हणाले की, माझ्या या यशात माझे कुटुंब, मार्गदर्शन लाभलेले संपादक, जेष्ठ पत्रकार मित्र, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले. त्यामुळेच मी हे कार्य करू शकलो. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सर्वांचा आहे. या पुरस्काराने जबाबदारीत आणखी वाढ झाली असल्याची जाणीव ठेऊन मी भविष्यातही पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत राहून अधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्न शील राहिल, असे सांगितले. यावेळी ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार शामकांत पाटील विजय पाटील सुरेश बारघरे, खडसे आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content