शहापूर परिसरातील अवैध धंदे बंद करा : खडसेंना निवेदन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शहापूर येथील अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आमदार एकनाथराव खडसे यांना देण्यात आले आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल संतोष पाटील यांनी निवेदन दिले आहे. यात जामनेर तालुक्यातील शहापूर या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या भागात सट्टा-पत्ता-जुगार आदींसह अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे सर्वसामान्यांचे जीवन उध्दवस्त होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

दरम्यान, हे निवेदन मिळाल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Protected Content