खोटे नगर परिसरातून ट्रक चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  । जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉप येथे उभा असलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी २९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भगवान दिवसांत चौधरी (वय-४५) रा. देवपूर धुळे यांचा मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच १८ एए ८४६५) ह ट्रक २१ मार्च २०२२ रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉप येथे लावलेला होता. तो ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या संदर्भात ट्रक मालक भगवान चौधरी यांनी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी २९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content