अजिंठा घाटात एसटी बसची आयशरला धडक; चालकांसह ९ प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंजिठा घाटात एसटी बसने आयशरला धडक दिल्याची घटना घडली आहे. नांदेडवरून भुसावळला जात असलेल्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने समोरली आयशरला धडक दिल्यामुळे चालक व वाहकांसह ९ जण जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी ८ मे रोजी संध्याकाळाच्या सुमारास घडली आहे.

या झालेल्या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी प्रवाशांना अजिंठा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content