अज्ञात वाहनाने पादचाऱ्याला उडविले; जळगाव शहरातील घटना !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस समोरील रस्त्याने शतपावली करण्यासाठी गेलेल्या डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर यांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाचे उडविल्याने जागीच ठार झाल्याची घटना बुधवार ८ मे रोजी रात्री ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुरूवार ९ मे रोजी पहाटे ३ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षद भाऊराव लांडे वय-४३ रा. गोरवले रोड, पोर्तूगीज चर्चजवळ, मुंबई असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षद लांडे हे वडील, पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत मुंबई येथील पोर्तूगीज चर्चजवळ वास्तव्याला आहे. ते डब्ल्यूएचओ च्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर म्हणून नोकरीला होते. बुधवार ८ मे रोजी मध्यरात्री १ वाजता ते डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या मिटींगसाठी ते आपल्या टिमसह जळगाव शहरातील हॉटेल मिनर्वा येथे उतरले होते. ८ मे रोजी दिवसभर त्यांनी मिटींगला हजेरी लावली. मिटींग आटोपल्यानंतर ते त्यांनी जेवण केले. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक दरम्यान शतपावली करण्यासाठी निघाले. त्यावेळी हॉटेल रॉयल समोरून जात असतांना रात्री ११.३० वाजता भरधाव वेगाने जाणारी चाकचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरीकांनी मदतीची धाव घेवून खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुरूवार ९ मे रोजी पहाटे ३ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ इरफान मलिक आणि पो.कॉ. विजय जाधव हे करीत आहे.

Protected Content