नऱ्हे- धायरी मार्गावर टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे- धायरी रस्त्यावर घडली. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला आहे. दुचाकीस्वार नयन 11 एप्रिल रोजी दुपारी पावणेएकच्या सुमारास धायरी रस्त्यावरील डी मार्टसमोरुन निघाला होता. त्यावेळी भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली.

नयन आदेश मारणे (वय २०, रा. धायरी फाटा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत युवराज मारणे (वय ३९, रा. धायरी फाटा) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नयनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.

Protected Content