नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाची पोलिसांनी तडीपाराची नोटीस काढली आहे. मात्र बडगुजर यांनी नोटीस घेण्यास नकार देत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार आहे. सलीम कुत्ता या अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीशी संबंध असल्यामुळे त्यांना नोटीस आली आहे. सलीम कुत्ता प्रकरणी सुधाकर बडगुजर अडचणीत आले आहे.

सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता. त्यांच्याशी बडगुजराचे संबंध आहे. असा त्यांच्यावर आरोप होता. सलीम कुत्ता यांच्या नाशिक येथील फार्महाऊसवर त्याने लग्न केल्याचाही आरोप आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केलेली. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दाऊदच्या टोळीतील सदस्यासोबत पार्टी करताना आणि डान्स करताना आढळला. ज्याचा व्हिडीओ आणि फोटो भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत दाखवले होते. हा मुद्दा दादाजी भुसे, आशिष शेलार यांनीही उपस्थित केला होता. आता ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्याने नाशिकचे राजकारण कोणते वळण घेत हे पाहावे लागेल.

Protected Content