दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आसोदा ते सुजदा रस्त्यावरील नांद्रा फाट्याजवळ दोन दुचाकीच्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी १० सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र सदाशिव सोनवणे, तुळशीराम पांडुरंग सोनवणे, दोघे रा. सुजदे, ता. जळगाव असे जखमी झालेल्यांची नावे आहेत .

याबाबत अधिक अशी माहिती अशी की, सुजदे येथील रामचंद्र सोनवणे व तुळशीराम सोनवणे हे शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास  दुचाकीने (क्र. एमएच १९, बीएम १११६) घरी जात होते. त्या वेळी आसोदा ते सुजदे दरम्यान नांद्रा फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच १९, आर ६२८२) सोनवणे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकीवरील तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी सोनवणे यांचे नातेवाईक तुषार महारु सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.

Protected Content