धक्कादायक : आयटी कंपनीने चोरला 7.8 कोटी लोकांचा आधार डेटा

adhar data

 

हैदराबाद (वृत्तसंस्था) तेलगु देसम पार्टीसाठी ‘सेवामित्र’ हे अॅप बनवणाऱ्या आयटी कंपनीविरोधात हैदराबाद पोलिसांनी आधार डेटा चोरीसंदर्भातला गुन्हा नोंदवला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या ७.८ कोटींहून अधिक नागरिकांचा डेटा बेकायदेशीर हाताळल्याचा या कंपनीवर आरोप आहे. युआयडीएआयच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

 

एफआयआरनुसार, हा संपूर्ण डेटा एका रिमूव्हेबल स्टोरेज डिव्हाइसमध्ये ठेवण्यात आला होता. हे आधार अॅक्टचे उल्लंघन आहे. फॉरेन्सिक तंज्ञांनी संशय व्यक्त केला आहे की, हा डेटा सेंट्रल डेटा रिपॉजिटरी किंवा स्टेट डेटा हबच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे मिळवण्यात आला असावा. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कथित डेटा चोरी प्रकरणांचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे सोपवले जाऊ शकते. आंध्र प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलुगू देशम पक्षाने ‘सेवामित्र’ हे नवीन अॅप लॉंच केले आहे. या अॅपचा करार ज्या कंपनीला दिला त्या आयटी ग्रीड्स (इंडिया) कंपनीच्या आयटी सेलने ७ कोटी ८० लाखांहून अधिक लोकांचा डेटा चोरला असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, एसआयटी आणि युआयडीएआयने दिलेल्या माहितीच्या आधारे माधापूर पोलीस ठाण्यात आधार अॅक्टअंतर्गत वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content