बैलगाडी थांबविण्यावरून वृध्दाला दगड मारून केले जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेताच्या बांधावर बैलगाडी थांबविण्याच्या कारणावरून ६५ वर्षीय वृध्दाला दोन जणांनी डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास धानवड शिवारात घडली. याप्रकरणी वृध्दाच्या फिर्यादीवरून गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, मंगळवारी सकाळी ९.३० वाजता डिगंबर रामदास मानके (वय ६५, रा.धानवड) हे पत्नीसह बैलगाने शेतात गेले होते. शेताच्या बांधावर बैलगाडी थांबविल्यानंतर शेजारच्या शेतातील भरत देविदास पाटील व गणेश भरत पाटील (रा.धानवड) यांनी मानके यांना बांधावर गाडी थांबविल्याच्या कारणावरून गोंधळ घालत डोक्यावर दगड मारला. यात मानके हे जखमी झाले आहेत. एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content