नूतन मराठा हाणामारीप्रकरणी तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात सत्ता संघर्षातून झालेल्या हाणामारी प्रकरणी आज सकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झालेले दोघे आणि काल अटक केलेल्या एका जणासह तिघांची आज दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात सत्ता संघर्षातून झालेल्या हाणामारीप्रकरणी मार्च २०१८ मध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल होते. यानुसार एका गटाकडून विजय पाटील यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल होता. मात्र या प्रकरणात कुणालाही अटक झाली नव्हती. तसेच संशयितांनी अटकपूर्व जामीनही घेतला नव्हता. काल सकाळी विजय पाटील यांना अटक केल्यानंतर आज सकाळी विनोद देशमुख व मनोज भास्कर पाटील हे दोघे स्वतःहून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. या तिघांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यावेळी आरोपींतर्फे अॅड.पी.एन. पाटील तर फिर्यादीतर्फे अॅड.मुकेश शिंपी यांनी काम पाहिले.

Protected Content