सॅल्यूट टू बच्चन : पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांना दिले प्रत्येकी १० लाख तर २०८४ गरीब शेतकऱ्यांचे फेडले कर्ज

Amitabh Bachchan Screen Gra 1539431172

मुंबई (वृत्तसंस्था) चित्रपटाचे महानायक अमिताभ बच्चन यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात तब्बल ७० कोटी रुपयांचा कर भरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रवक्त्यांनं ही माहीती दिली आहे.

 

अमिताभ यांनी ७० कोटींचा कर भरला असून जम्मू-काश्मीरमध्ये पुलावामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांचा मदतनिधी देखील दिला आहे. त्याशिवाय बिहारच्या मुजफ्फरपूर येथील २,०८४ शेतकऱ्यांचे कर्जही त्यांनी फेडल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आलेले आहे.

वयाच्या ७७ व्या वर्षीहि कामात व्यस्त असलेले अमिताभ बच्चन या वर्षी ‘बदला’ या सिनेमात दिसले. तर ‘ब्रम्हास्त्र’ हा त्यांचा येऊ घातलेला सिनेमा असणार आहे. ख्रिसमसमध्ये ब्रम्हास्त्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. अमिताभ यांच्यासोबत या सिनेमात रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, बिग बी लवकरच तामिळ सिनेमातही पदार्पण करणार आहेत.

Add Comment

Protected Content