श्रावण मास संपण्यापुर्वीच नऊ बकऱ्या व ११ बोकडची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रावण मास संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना चोरट्यांनी गोठ्यामध्ये बांधलेल्या नऊ बकऱ्या व ११ बोकड चोरून नेल्याची घटना  जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे ९ सप्टेंबर रात्री ८  ते १० सप्टेंबरच्या सकाळ १० वाजेच्या दरम्यान घडली आहे.  या प्रकरणी जळगाव तालुक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक गावात चांदसर रस्त्यावर विजय श्रावण बाविस्कर व रवींद्र प्रकाश वाघ या पशुपालकांचा गोठा आहे. ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या बकऱ्या व बोकड गोठ्यात बांधले होते. त्यानंतर रात्रीपासून ते १० सप्टेंबर रोजी सकाळ सात वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने नऊ बकऱ्या व ११ बोकड चोरुन नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र विचारपुस व शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही.  यात पशुपालकांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी विजय बाविस्कर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध रविवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहेत.

Protected Content