अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जळगाव शहरात भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक २ च्या वतीने महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार ३० मे रोजी सकाळी या स्पर्धेचे नेतृत्व मंडळ अध्यक्ष दीपमाला मनोज काळे यांनी केले.

या स्पर्धेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आयोजक दीपमाला मनोज काळे, महिला मोर्चा अध्यक्ष भारतीताई सोनवणे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जी.एम. फाऊंडेशन येथून सुरू झालेली ही मॅरेथॉन अण्णासाहेब जी.डी. बेडाळे महिला महाविद्यालय, अणुव्रत भवन, सायली हॉटेल, गोकुळ स्वीट मार्ट, नूतन मराठा कॉलेज आणि जिल्हा न्यायालय या मार्गावरून पुन्हा जी.एम. फाउंडेशन येथे समाप्त झाली.

स्पर्धेतील विजेते:
15 वर्षांखालील गट: सुहानी केशवलाल कसदेकर, मयुरी चंद्रशेखर महाले

16 ते 35 वयोगट: जानवी संजय रोझोदे, तय्यबा कलेखा तडवी

35 वर्षांवरील खुला वयोगट: ममता संजय सपकाळे, रेखा संजय कुमार शर्मा

या स्पर्धेचे परीक्षण संजय मोती सर, डॉ. विजय पाटील सर आणि इक्बाल मिर्झा सर यांनी केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करून महिलांना आरोग्यासाठी प्रेरित करण्याचा या मॅरेथॉनचा उद्देश होता.