चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील गलंगी येथे पोलीस चौकी समोरून दुचाकीवरून १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा साडेसात किलो वजनाचा ओला गांजा याची वाहतूक करणारा दोन जणांवर चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील गलंगी गावाजवळील पोलीस चौकीच्या समोरून संशयित आरोपी शिव दिनेश भोसले (वय-२२) आणि सुनील यशवंत नन्नवरे (वय-२०) दोन्ही रा. धरणगाव यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे १ लाख ७२ हजार रुपये किमतीचा ७.३० किलो वजनाचा ओला गांजा आढळून आला. पोलीसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यांच्याजवळ असलेल्या गांजा दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिव भोसले आणि सुनील नन्नवरे यांच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास परिस्थिती कमलाकर हे करीत आहे.