भरधाव बसची ओमनीला धडक; प्रवासी थोडक्यात बचावले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील महामार्गावर भरधाव बसने ओमनी चारचाकी वाहनाला जोरदार धडक देवून नुकसान केल्याची घटना गुरूवारी १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोल पंपाजवळ प्रवाशी ओमनी चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १५ डीएम ६९५०) ही उभी होती. गुरूवारी १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव ते भुसावळ जाणारी बस क्रमांक (एमएच ०६ एस ८५३४) वरील चालक विजय शिवाजी पाटील रा. खेडी ता.जि.जळगाव याने ऑमली पदार्थ सेवन करून वाहन हयगीने चालवून ओमनी वाहनाला जोरदार धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाले असून वाहनातील प्रवाशी हे थोडक्यात बचावले. याप्रकरणी जळगाव बसस्थानक प्रमुख मनोज तिवारी यांनी याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेाहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.