Home Cities जळगाव जळगावात १९ मे रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

जळगावात १९ मे रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

0
135


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील समस्याग्रस्त आणि पिडीत महिलांच्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा महिला लोकशाही दिन येत्या १९ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे.

महिलांना त्यांच्या अडचणी व तक्रारी शासकीय यंत्रणेसमोर मांडता याव्यात आणि त्यांचे निराकरण व्हावे, तसेच समाजातील पिडीत महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. या पार्श्वभूमीवर, येत्या १९ मे रोजी होणाऱ्या महिला लोकशाही दिनात जिल्ह्यातील गरजू महिलांनी वेळेत जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound