Home Cities अमळनेर यात्रेत जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला ; सात जणांविरुद्ध गुन्हा

यात्रेत जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला ; सात जणांविरुद्ध गुन्हा

0
101


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यू जप्रतिनिधी । अमळनेर येथील नदीपात्रात भरलेल्या यात्रेत जुन्या वादाच्या कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात निखिल सुरेश पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

निखिल सुरेश पाटील हा तरूण ११ मे रोजी रात्री १०:३० च्या सुमारास यात्रेत फिरत असताना, संशयित आरोपी योगेश गोविंद कंखरे, ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला गाठले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि चाकू होता. जुन्या भांडणाच्या रागातून त्यांनी निखिलला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. योगेश कंखरे याने चाकूने निखिलच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला, जो निखिलने हाताने अडवला. या झटापटीत त्याच्या हाताची नस तुटली असून बोटही फ्रॅक्चर झाले आहे.

ज्ञानेश्वर पाटील याने लोखंडी रॉडने निखिलच्या डोक्यावर वार केला, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात्रेतील पोलीस बंदोबस्त पाहून संशयित आरोपींनी निखिलला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पळ काढला. जखमी निखिलला प्रथम धुळे येथील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध दंगल आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound