यावलमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानाला जळगाव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यावलमध्येही या अभियानाला महिला आणि तरुण वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या आदेशानुसार, यावलमध्ये प्रमुख मार्गावरील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलासमोर १६ मे रोजी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले.

यावेळी यावल तालुकाप्रमुख राजू काठोके, शहरप्रमुख पंकज बारी, महिला शहरप्रमुख ॲडव्होकेट स्वाती पाटील, शिवसेना युवा तालुकाप्रमुख अजय तायडे, उपशहरप्रमुख राजू सपकाळे, चेतन सपकाळे, शहर समन्वयक ॲडव्होकेट सिद्धार्थ लोंढे आणि शिवसेना कार्यकर्ते अविनाश किरण बारी, किशोर कपले, सागर सपकाळे, मनोहर पाटील आदी उपस्थित होते. यावल शहर आणि परिसरातील महिला, पुरुष आणि तरुण वर्गाने या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक जण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे सदस्य होत आहेत.