Home प्रशासन भुसावळ येथे ३० जूनला माजी सैनिकांसाठी विशेष मेळावा

भुसावळ येथे ३० जूनला माजी सैनिकांसाठी विशेष मेळावा

0
12


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच त्यांच्या अवलंबितांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी भुसावळ येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ३० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे आयोजित करण्यात येणार आहे.

माजी सैनिकांच्या सेवा निवृत्तीनंतरच्या विविध समस्या, निवृत्तीवेतन, कागदपत्रे, बँकिंग तसेच इतर प्रशासकीय बाबींचे निराकरण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात संबंधित विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या मेळाव्यास Army Placement Node, Pune, PCDA Allahabad, Records ARMD Corps, Records MAHAR Regiment, Records MIRC, Records The Maratha Light Infantry Regiment, EME Records, Records The Mech Infantry Regiment, Signal Records, MEG Records, BEG Records, Arty Records यांसह विविध सैन्य विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. याशिवाय माजी सैनिकांच्या आर्थिक आणि बँकिंग विषयक समस्या सोडविण्यासाठी CPPC स्टेट बँक ऑफ इंडिया, CPPC पंजाब नॅशनल बँक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव आणि बुलडाणा येथील अधिकारी व प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच अवलंबितांनी आपल्या अडचणींचे निवेदन तयार करून त्याच्या छायांकित तीन प्रतींसह मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. या मेळाव्यामुळे माजी सैनिकांना विविध शासकीय योजना, सेवा सुविधा आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. संबंधितांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे


Protected Content

Play sound