अधिक उत्पादन वाढीसाठी सोरटेड सीमेन तंत्र महत्वाचे – डॉ. शामकांत पाटील

चाळीसगाव, प्रतिनिधी । जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र जळगाव, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने झूम ॲपच्या साहाय्याने ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक दुग्ध दिन 2021 कार्यक्रमाचे आयोजन झूम ॲप च्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर आर पाटील जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी जळगाव, मनोज लिमये कार्यकारी संचालक जिल्हा दुग्ध संघ जळगाव, डॉ. सीएम पाटील प्रमुख प्रशासन विभाग जिल्हा दूध संघ जळगाव आणि अध्यक्ष म्हणून डॉ. श्यामकांत पाटील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जळगाव हे उपस्थित होते. डॉ. शामकांत पाटील यांनी उपस्थित पशुपालक यांना सोरटेड सीमेन (नर व मादी बछड्यांची निवड पद्धत) या तंत्राचा वापर करण्याबाबत सुचवले यामुळे शेतकऱ्यांना केवळ मादी बछड्याची निर्मिती होऊन एकूण दूध उत्पादनामध्ये वाढ होऊ शकेल. या तंत्राचा वापर करण्यासाठी 800 ते 900 रुपये खर्च येतो परंतु शासकीय मदतीमुळे शेतकऱ्यांना केवळ 81 रुपये मध्ये मिळणार आहे. जनावरांमधील रोगाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने लसीकरण करणे आवश्यक आहे. श्री लिमये यांनी कोरोनामुळे दुग्ध व्यवसाय परिणाम झाला, परंतु लवकरच दुधाची मागणी वाढणार आहे असे सांगितले. डॉ.सी एम पाटील यांनी संसर्गजन्य आजारामुळे 20 टक्के दूध उत्पादन कमी होते. त्यासाठी जनावरांचे आरोग्य चांगले ठेवून उत्पादन वाढवता येईल असे सांगितले. आर आर पाटील यांनी पशुपालक शेतकऱ्यांनी नोंदणीकृत संस्था स्थापन करून मूल्यवर्धित दुधाचे पदार्थ तयार करावेत असे सुचवले.

किरण मांडवडे यांनी आजच्या कार्यक्रमांमध्ये स्वच्छ दूध उत्पादन याविषयी सादरीकरण केले. जागतिक दुग्ध दिन हा पशुपालक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून दुधाविषयी ग्राहकांमध्ये देखील जागरूकता निर्माण व्हावी, असे डॉ. बाहेती कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांनी सांगितले. ऑनलाईन पद्धतीने डिजिटल पोस्टर (विषय स्वच्छ दूध उत्पादन तंत्र) चे विमोचन करण्यात आले. डॉ.श्यामकांत पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांचे प्रश्नोत्तराच्या सत्रांमध्ये शंकानिरसन केले. आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध स्तरावरील विस्तार कार्यकर्ते, पशुपालक शेतकरी व ग्रामीण युवक या सर्वांनी सहभाग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल वैरागर आणि आभार प्रदर्शन इंजी. वैभव सूर्यवंशी यांनी केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.