गाडीची बॅटरी काढण्याच्या कारणावरून दोघांचे भांडण

जळगाव प्रतिनिधी । गाडीची बॅटरी काढण्याच्या कारणावरून शाहूनगरात दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.  याप्रकरणी आज बुधवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहुनगर परिसरात १ जून रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास सतिष रामदास कासार (वय-३४) रा. मिलनी टेन्ट हाऊस, शाहुनगर यांच्या वाहनाची बॅटरी काढल्याच्या संशयावरून वसिम खान अय्युब खान (वय-२५) रा. पिंप्राळा रोड शाहुनगर याचा विचारणा केली. याचा राग आल्याने वसिम खान आणि सतिष कासार यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली. तसेच वसिमचा भाऊ मुस्तगील खान याला देखील चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. दोघांनी एकमेंकांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दोघांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे हे करीत आहे.

Protected Content