मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे आयोजित गरबा स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद

garaba workshop

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने शहरातील सिताराम पहेलवान मळा येथे एकदंत कला महोत्सवाच्या निमित्ताने गरबा नृत्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेआधी दुपारी तरुण-तरुणींना गरबा नृत्याचे प्रशिक्षण दिले गेले. त्यानंतर सायंकाळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला शहर व परिसरातील युवक-युवतींचा दणदणीत प्रतिसाद लाभला.

 

यानिमित्ताने संयोजक मंगेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात सांगितले की, “चाळीसगाव तालुक्यातील युवक-युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रत्येकाला आपले कलागुण प्रदर्शित करण्याची संधी दिली जावी, याच उद्देशाने या महोत्सवांतर्गत गरबा नृत्याची स्पर्धा ठेवली गेली आहे. गरबा नृत्य हे माणसाच्या सामूहिक विकासाला पोषक असे नृत्य आहे. एकमेकाला साथ देत या हे गरबा नृत्य करता येते.

गरबा नृत्याचे प्रशिक्षण वर्कशॉपमध्ये २५० इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवला तर सायंकाळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत ३०० युवक-युवती यांनी सहभाग घेतला. यातून प्रथम व द्वितीय अशी दोन पारितोषिक मिळणार असून त्याची घोषणा १२ तारखेला केली जाणार आहे. यावेळी गरबा नृत्य वर्कशॉप व गरबा नृत्य स्पर्धेचे परीक्षण पी.डी.एस. गृप नाशिक यांनी केले.

या कार्यक्रमास शरद मोराणकर, महेंद्र पाटील, पंकज देवकर, संग्राम शिंदे, अ‍ॅड.,धनंजय ठोके, पोतदार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उपाध्याय, माजी पं.स.सदस्य सतिश पाटे, नगरसेविका विजया पवार, वैशाली राजपूत, संगीता गवळी, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, बापु अहिरे, चंदु तायडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, निलेश महाराज, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, नांद्रे सरपंच अनुराधा पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण, दक्षता समिती सदस्य हर्षल पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र वाघ, सचिन दायमा, अजय जोशी आदी उपस्थित होते.

एकदंत कला महोत्सवाला तालुक्याभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अधिकाधिक लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी आयोजकांतर्फे करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भावेश कोठावदे यांनी केले.

Protected Content