चोपडा येथील पंकज महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यक्रम

pankaj clg

चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून राधेश्याम पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किशोर पाठक यांची उपस्थिती लाभली होती.

प्रमुख मार्गदशक राधेश्याम पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, वाचानामूळे व्यक्तीमत्वाचा विकास होतो. तसेच त्यांनी अनेक थोर पुरुषांचे व्यक्तीमत्वाचे सांगितले. व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करीत असताना आळस, राग, चिंता, तणाव, दुसऱ्याची तुलना या सर्व गोष्टी दुर करुन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करा, आणि यशस्वी होण्यासाठी व्यक्तीमत्व विकास होणे महत्त्वाचा आहे.
याचबरोबर, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की, प्रत्येकांनी आत्मविश्वास ठेवायला पाहिजे. आत्मविश्वासामुळे आपल्या व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल होतो, आणि विद्यार्थ्यांनी सक्षम होवून आदर्श समाज घडवावा. असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे आयोजन, सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. डॉ महादेव वाघमोडे यांनी केले तर आभार प्रा. दिलीप पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content