कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार केली विशेष मशीन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डब्ल्यूएचओ आणि सर्वच देशातील शासनाने दिलेल्या सूचनानुसार स्वच्छते विषयक नियम पालन करणे गरजेचे आहे, कारण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिने विशेष मशीन तयार केली आहे.

कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी ही मशीन फायदेशीर ठरणार आहे. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे उपकरण हॉस्पिटलसाठी बनवलेले आहे. हे त्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कोरोना व इतर रोगांचा प्रसार थांबवण्यासाठी पेट न घेता मास्क व हँड ग्लोज नष्ट करणारी मशीन बनवली आहे. ही मशीन पूर्णपणे स्वयंचलित आहे यामुळे वैद्यकीय कचरा पासून फैलाव होणार्‍या रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

यंत्र विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी योगेश सपकाळे, दर्शन पाटील, मयूर देशमुख व दादाभाई लकी सारी यांनी हे उपकरण बनविले आहे.

या उपकरणाला चालवण्यासाठी विजेची गरज पडते. मास्क व हॅण्ड ग्लोज या मशीनमध्ये टाकल्यावर बॅण्ड हीटर त्याला पूर्णपणे राखे च्या रूपात रूपांतरित करते व राख झाल्यावर मशीन आपोआप बंद होते. त्यामधील उष्णता रोखण्यासाठी काचेचे लोकर वापरले आहे व प्रदूषित वायू बाहेर पडू नये, म्हणून त्यात कार्बन फिल्टर वापरले आहे. या प्रोजेक्टसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार तसेच विभाग प्रमुख प्रा. तुषार कोळी व प्रकल्प समन्वयक प्रा. किशोर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content