भुसावळात अनोखळी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्सच्या ओट्यावर एका अनोखळी ४० ते ४५ वर्षीय इसमाचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ ग्रामीण रूग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला असून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी कॉम्प्लेकस येथील ओट्यावर मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एक अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आला. पोलीसात मयताची ओळखी पटविण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुमन राठोड करीत आहे.

Protected Content