रक्षाबंधन निमित्त भाजपा महिला मोर्चातर्फे अनोखा उपक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानथी अक्का श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली “स्नेहयात्रा ” रक्षाबंधनाचा कार्यक्रम  २९ ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत महाराष्ट्रभरात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जळगाव भाजपा महिला महानगरच्या वतीने शहरातील जिल्हा पोस्ट कार्यालयात ५० पोस्टमन बंधून यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवाय एसटी बसस्थानका १०० बांधवांना देखील राख्या बांधण्यात आले.

 

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा विविध समाज उपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात येतो. यात यावर्षी केंद्राकडून आलेल्या कार्यक्रमानुसार प्रत्येक जिल्ह्यात विशेष करून “रिक्षा, टॅक्सी, बस चालक, डिलिव्हरी बॉईज, अग्रणीय सामाजिक सेवाभावी संस्था, रक्तदाते मंडळी” यांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे राखी बांधून आपल्या बंधुत्वाच्या नात्यात जोडण्याचं उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात प्रदेश च्या सूचनेनुसार साजरे करण्यात येणार.

 

यात आज जळगाव शहरात जिल्हा पोस्ट ऑफिस येथे ” ५० पोस्टमन बंधू” यांना राखी बांधण्यात आली व “एसटी बस स्थानक ” येथे “१००  बांधवांना” स्नेहाच्या नात्यात जोडण्याचे काम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा द्वारे करण्यात आले.  विशेष करून ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात  त्याबद्दल त्यांचे आभार मानुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी महिला महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, सहाय्यक कार्याध्यक्ष निलेश बंडखोळे यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम प्रदेश सचिव रेखा वर्मा, जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस नीतू परदेशी, रेखा कुलकर्णी,  नीला चौधरी, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, छाया सारस्वत या उपस्थित होते.

Protected Content