दापोरा शिवारात रेल्वे रुळावर अनोळखी मृतदेह आढळलेल्या तरूणाची ओळख पटली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ बुधवार, १ डिसेंबर रोजी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटली असून अभिजित गजानन मिश्रा (वय-१९) रा.लाझोडा हनुमान मंदीरजवळ, गडचिरोली असे मयत तरूणाचे नाव आहे. मित्रासह पुण्याला जाण्यासाठी गरीब रथ या रेल्वेने प्रवास करत होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 

याबाबत माहिती अशी की, अभिजित मिश्रा हा त्याचा मित्र परिमल गोपीनाथ कोडापे यांच्या सोबत गडचिरोलीहून नागपूरला लक्झरीने आले. नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता गरीब रथ रेल्वेत बसले. जळगावपर्यंत आल्यानंतर रात्री ११.३० वाजता दोघांनी रेल्वेत जेवन केले. त्यानंतर परिमल हा झोपून गेला. तर अभिजित मिश्रा हा रेल्वे बोगीत जागे होता. दरम्यान सकाळी ४ वाजेच्या सुमारास परिमल जागी झाला तेव्हा मित्र अभिजित मिळून आला नाही. त्याचा शोधाशोध केली तो मिळून न आल्याने परिमलने अभिजितच्या वडीलांना घटनेची माहिती दिली. त्याचे वडील सेवानिवृत्त जवान आहेत. त्यांनी रेल्वे रूटवर असलेल्या सर्व रेल्वे पोलीसांना याची माहिती दिली. नगर रेल्वे पोलीसांना मुलाबाबत माहिती दिल्यानंतर तेथील पोलीसांनी जळगाव तालुका पोलीसांशी संपर्क साधला असता अनोळखी तरूणाचा मृतदेह १ डिसेंबर रोजी सकाळी दोपारा शिरसोली दरमन रेल्वे रूळावर आढळल्याचे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी अभिजितचे नातेवाईक यांनी जळगाव जिल्हा रूग्णालयात आले असता मुलाची ओळख पटली. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अभिजितच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे. पुढील तपास  पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content