अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू ; एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शिरसोली रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शिरसोली रस्त्यावर असलेल्या आर.के. ढाबा येथे भीका कडू महाजन (वय-४५) रा. टाकरखेडा ता. यावल जि. जळगाव हा तरूण गेल्या काही महिन्यांपासून वेटर म्हणून कामाला आहे. भीका महाजन हा २ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्यावर पायी जात असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला ढाब्यावरी संताजी लाडवंजारी यांनी  तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई सुसाबाई, बहिण दुर्गाबाई असा परिवार आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.ना. सुद्दोधन ढवळे हे करीत आहे.

 

Protected Content