श्रीराम माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील श्रीराम तरुण मित्र मंडळ संचलित श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागलेला असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयात करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी हे होते. संचालक वासुदेव सानप, संस्थेचे संचालक भगवान लाडवंजारी संतोष चाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 

सेमी माध्यम गुणवंत विद्यार्थी :-

1. अंकिता इंगळे 94.80% प्रथम क्रमांक

2. दीक्षा तायडे 91.80%  द्वितीय क्रमांक

3. सीमा पाटील 85.60% तृतीय क्रमांक

4. रेशमी पाटील 85.20% चतुर्थ क्रमांक

5. कल्पेश बाविस्कर 83.60% पाचवा क्रमांक

मराठी माध्यम गुणवंत विद्यार्थी :-

1. डिंपल राणे 81% प्रथम क्रमांक

2. आरती नाईक79.80% दुतिय क्रमांक.

3. डिंपल पाटील78.60% तृतीय क्रमांक

इयत्ता दहावी ला गुणवंत  प्रथम ,द्वितीय, तृतीय चतुर्थ व पाचवा  आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला मराठी विषयातून प्रथम क्रमांक आलेल्या व 90 गुणांच्या वर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर यांच्याकडून 1001 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या आई कैलासवासी कुसुम जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्याची घोषणा केली.

तसेच इंग्रजी विषयात 90 गुण असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिक्षिका प्रतिभा पाटील यांच्याकडून  आपले वडील कैलास वासी प्रभाकर धर्मा महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. तसेच संस्थेचे संचालक वासुदेव सानप यांच्या कडून प्रथम क्रमांक आलेल्या अंकिता इंगळे, व डिंपल राणे या विद्यार्थ्यांना 501 रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रतिभा पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम व सहकार्य घेतले

 

Protected Content