चौगाव येथे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

chaugaon

 

 

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चौगाव येथील जि.प शाळेत 5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीसह शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जि.प. शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका यांचा उत्तम कार्य बघून गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच राजेंद्र पाटील मुख्याध्यापक, प्रल्हाद ठाकरे उपमुख्याध्यापक, दिपक बारेला, ज्ञानेश्वर पाटील, सुधाकर पाटील, संजीव शेटे, कपीला पाटील, विलास पाटील, विद्यानंद साठे, प्रितम पाटील यांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. पञकार तथा राज्यस्तरीय ग्रीन मॅन अवार्ड तथा राज्यस्तरीय पर्यावरण रत्न पुरस्कार प्राप्त विश्राम तेले, पञकार संदीप कोळी तथा आदिवासी वाल्मिकलव्य सेना चोपडा तालुका अध्यक्ष व राष्ट्रवादी युवा काँग्रेस चोपडा तालुका संघटक, विशाल कोळी आदिवासी वाल्मिकलव्य सेना चोपडा तालुका संघटक तथा राष्ट्रवादी युवा काँग्रेस चोपडा तालुका उपाध्यक्ष, तसेच विजय कोळी, दिलीप शिंदे, मुकेश धनगर, सागर पाटील, शिवाजी कोळी, भुषण कोळी यांचा हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उप मुख्याध्यापक प्रल्हाद ठाकरे व इतर शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले आहे.

Protected Content