दुचाकी चोरीच्या अट्टल गुन्हेगाराला चोपडा बसस्थानक परिसरातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील बसस्थानक परिसरातून गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चोपडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

         राजेश श्रीराम बारेला (वय-२२) रा. मोहन पडवा ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.

            याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातून दोन आणि अमळनेर शहरातून एक अश्या तीन दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हा चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ संदीप पाटील, प्रविण मांडोळे, पो.ना. परेश महाजन, दिपक शिंदे, प्रमोद ठाकूर यांनी गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी राजेश श्रीराम बारेला (वय-२२) रा. मोहन पडवा ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) याला चोरीच्या दुचाकीसह अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोपडा शहरातून दोन आणि अमळनेर शहरातून एक अश्या तीन दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चोपडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content