देवीसिंग शेखावत यांचे निधन

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देविसिंह शेखावत यांचे आज निधन झाले आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती तथा अमरावतीचे माजी आमदार, माजी महापौर देविसिंह शेखावत यांनी आज पहाटे शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते पहिल्यापासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

देविसिंग शेखावत यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Protected Content