Home क्राईम नळावर पाणी भरण्यावरून कुटुंबाला शिवीगाळ व धमकी

नळावर पाणी भरण्यावरून कुटुंबाला शिवीगाळ व धमकी

0
120

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या रिया रवींद्र देवरे हिच्यासह तिच्या आई, वडीलांना अश्लिल शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडली. या प्रकरणी रियाचे दोन्ही काका, काकूं अशा तीन जणांविरुद्ध सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, रिया देवरे ही मुलगी शुक्रवार १३ रोजी संध्याकाळी तिचे काका अशोक बाबुराव देवरे यांच्या घरासमोरील नळावर पाणी भरण्यासाठी गेली. त्याचा राग आल्याने अशोक देवरे, भारती अशोक देवरे व लहान काकांनी रियासह तिची आई मंजू देवरे यांनाही शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

रियाचे वडील रवींद्र देवरे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी मंजू देवरे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी शिवीगाळ करणाऱ्या तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हरिष शिंपी करीत आहेत.


Protected Content

Play sound