पिस्तूल व जिवंत काडतुसासह संशयिताला अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरातील गावठी पिस्तूल व काडतूस घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रामदास क्षिरसागर, (वय-35, रा. फडके खानावळ जवळ, अष्टभुजा हॉटेलच्या मागे, भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरात संशयित आरोपी राहूल क्षिरसागर हा हातात गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सुचना पथकाला दिल्या. पथकाने मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत संशयित आरोपी राहूल क्षिरसागर याला अटक केली. त्यांच्याकडून  गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यांनी केली कारवाई
सपोनि हरिष भोये, पोउनि मंगेश जाधव, पोहेकॉ सुनिल जोशी, विजय नेरकर, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी यांनी कारवाई केली.

 

Protected Content