धरणगावात २३ लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक

धरणगाव, प्रतिनिधी । पर राज्यातून ट्रकमध्ये गुटखा मागवण्यात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली हेाती. त्यानुसार पथकाने सापळा रचून धरणागाव जवळ मालवाहतूक ट्रक करणारा ट्रक अडवून पथकाने तपासणी केली. ट्रकमध्ये २३ लाख ३३ हजार ८८० रुपयांचा पाल पथकाने जप्त केला असून धरणगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची पर राज्यातून मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरु आहे. परराज्यातून गुटख्याची खेप येणार असल्याची गुप्त माहिती  गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रेाहम यांना मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक उपनिरीक्षक सुधाकर लहारे, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, रवींद्र घुगे अशांच्या पथकाने सापळा रचला मालवाहतूक ट्रक क्र (एम.एच.१९.झेड.०९६६) हा मालवाहतूक ट्रक अडवून तपासणी केली असता.त्यात गुटख्याचे पोते दडवून वाहतुक होत असल्यान आढळून आले. पथकाने  शेख रफिक शेख रज्जाक (वय 49 रा धरणगांव), कपिल रविद्रसिंग राजपुत अशा देाघांना ताब्यात घेतले असून धरणगाव पोलीसांत (भादवी कलम 328, 188, 272, 273 साथीचे रोग अधिनियम 3 व आपत्ती व्यवस्थापन अधीनीयम- 2005 च्या कलम 51(ब) प्रमाणे) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content