योग्य उपचार न मिळाल्याने वृध्दाचा मृत्यू; सिव्हीलमधील अनागोंदी

जळगाव प्रतिनिधी । आयसीयूची गरज असतांना जनरल वॉर्डमध्ये उपचार केल्याने एका वृध्दाचा मृत्यू झाल्याने मंगळवारी रात्री जिल्हा रूग्णालयात गोंधळ उडाला. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी आता करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील शिवाजीनगर भागातील एका ६५ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना १२ दिवसांपूर्वी सिव्हील हॉस्पीटलमधील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात जनरल वॉर्डात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना त्यांच्या नातेवाईकांना प्रकृतीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती दिली जात नव्हती.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी डॉक्टरांनी वृद्धाच्या नातेवाईकांना फोनवरून त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, या नंतरही संबंधीत रूग्णावर जनरल वॉर्डातच उपचार करण्यात आले. तर नातेवाईकांना याबाबत कोणताही माहिती देण्यात आली नाही. यानंतर त्यांना थेट मृत्यूची बातमी मिळाली.

हा सर्व प्रकार सुरू असतांना मंगळवारी रात्री कोविड रुग्णालयातून नातेवाईकांना थेट वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. यामुळे रूग्णाच्या आप्तांना प्रचंड धक्का बसला. खरं तर, अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवणे गरजेचे होते. डॉक्टरांनी तशा सूचना सहाय्यकांना केल्या होत्या. मात्र, एकमेकांत वृद्धावर जनरल वॉर्डातच उपचार सुरू राहिल्याने अखेर वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत वृद्धाच्या नातेवाइकांनी कोविड रुग्णालयाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येण्यास नकार दिला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव पसरला.

मृत वृद्धाचे नातेवाईक संताप करत असताना रुग्णालय प्रशासनाने आयसीयूत बेड शिल्लक नसल्याचे कारण दिले. तथापि, तीन दिवसांपूर्वी त्यांच्यासाठी आयसीयूमध्ये बेड असल्याचे सांगण्यात आले होते. मग ही घटना घडलीच कशी, असा प्रश्‍न करत मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रमक पवित्रा घेतला.

हा सर्व प्रकार सुरू असतांना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आप्तांचे फोन देखील घेतले नाही. रात्री उशीरापर्यंत याबाबत गोंधळ सुरूच होता. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी रूग्णाच्या आप्तांनी केली आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update

Protected Content