भाजपमधील काही मित्रांनी मदत केली ! : खडसे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्याला राष्ट्रवादीच्या कोट्यापेक्षा जास्त मते मिळाली असून ते भाजपमधील मित्र आणि अपक्षांनी मदत केल्याने आपण त्यांचे आभार मानतोय या शब्दांमध्ये एकनाथराव खडसे यांनी आज विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पहिल्या पसंतीची २९ मते मिळवून विजयी झाले. विजयानंतर त्यांनी टिव्ही नाईन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, मला राष्ट्रवादीच्या कोट्यापेक्षा जास्त मते मिळाली असून ते भाजपमधील काही मित्रांनी दिले आहेत. यासोबत काही अपक्ष आमदारांनीही आपल्याला मदत केल्याचे त्यांनी नमूद केले.

एकनाथराव खडसे म्हणाले की, मी सभागृहात येऊ नये म्हणून काही जणांनी प्रयत्न केले. तथापि, शरद पवार यांनी मला संधी दिली असून याचा नक्कीच जनसेवेसाठी उपयोग करणार असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले. गेल्या सहा वर्षापासून आपल्याला खूप त्रास देण्यात आला. अनेकविध आरोप करण्यात आले. मात्र असे असतांनाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपल्याला विधानपरिषदे संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Protected Content