गणेश कॉलनीत धुमस्टाईल चेन स्नॅचिंग; अज्ञात दोघांवर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठेत राहणाऱ्या महिला गणेश कॉलनीतून पायी जात असतांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात तरूणाने गळ्यातील ६५ हजार रूपये‍ किंमतीची सोन्याची पोत तोडून दुचाकीवरून दोघे पसार झाले. ही घटना २० मार्च रोजी दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता प्रकाश वाणी (वय-47) रा. नवी पेठ जळगाव ह्या शहरातील गणेश कॉलनी परिसरातील कृष्णा अपार्टमेंटजवळ पायी जात असताना एक अनोळखी तरूण अंगात पिवळा रंगाचे शर्ट घातलेला मागून पायी येऊन जवळ थांबून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने भामट्याने महिलेच्या गळ्यात असलेली २२ ग्रॅम वजनाची सोन्याची लहान पोत पोत व ४ ग्रॅमचे पेंडल असे एकूण ६५ हजार रुपयाची सोन्याचा दागिने गळ्यातून हिसकावून लांबविली. काही कळण्याच्या आत दोघे भामटे दुचाकीवरून पसार झाले. महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात दोन व्यक्तींविरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.

 

jalgaon taluka news, jalgaon city news, jalgaon live news, jalgaon live, jalgaon news, jalgaon update news, jalgaon crime news

Protected Content