महापौरपद पुन्हा सिमाताई भोळे यांना मिळाल्यास उत्तम – सुनिल महाजन (व्हिडीओ)

sunil mahakann

जळगाव प्रतिनिधी । विद्यामान महापौर सिमाताई भोळे यांनी शहरात चांगले काम केले आहे. महापौरपदी पुन्हा सिमाताई भोळे आल्यास उत्तम राहिल अशी प्रतिक्रिया मनपा विरोधी पक्ष नेता सुनिल महाजन यांनी लाईव्ह ट्रेन्ड न्यूजशी बोलतांना सांगितले.

जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले. याबाबत माजी उपमहापौर तथा पालिकेचे विरोधी पक्ष नेता सुनिल महाजन यांनी बोलतांना सांगितले की, राज्यात आरक्षण जाहीर करण्यात आले. यात जळगाव मनपाचेही महिला खुले आरक्षण जाहीर केले. अर्थात महिलांना देखील राजकरणात काम करण्याची संधी मिळाली आहे. महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. विद्यामान महापौर सिमाताई भोळे यांचे शहरातील कामे चांगले असून भविष्यात जर त्यांना संधी मिळाली तर विकास कामांना गती मिळेल असेही ते म्हणाले.

पहा । विरोधी पक्ष नेता सुनिल महाजन यांची प्रतिक्रीया

Protected Content